श्री संत सावता गुरुकुल च्या संकेत स्थळावर आपले स्वागत…

श्री संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा

15 June 2024

आज, दिनांक 15 जून, 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच नवागतांचे स्वागत शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोहळा संपन्न याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती कल्पना उरणकर या होत्या तर प्रमुख उपस्थिती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब चव्हाण सर हे होते, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले तसेच आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

News & Events

© Copyright 2022 - Shri Sant Savata Gurukul | Designed & Developed by

Total Visits: 21955

श्री संत सावता गुरुकुल विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.

-->