शाळेत शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुर्यनमस्कार शिकवतांना शिक्षक.
आज दि. 22 जुलै 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
आज दिनांक 17 जुलै , 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी !
आज, दिनांक 21 जून, 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संत सावता गुरुकुल प्राथमिक, माध्यमिक तसेच ,श्री संत सावता ग्रामीण महाविद्यालय- क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आज सावता संकुलामध्ये योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सकाळी 7:00 ते 8:30 वाजता झालेल्या या शिबिरासाठी योग शिक्षक म्हणून संभाजीनगर शहरातील श्रीमती वंदना अवघड मॅडम व त्यांच्या सहकारी कु . रक्षा राजपूत यांनी योगाचे प्रात्यक्षिक सर्वांकडून करून घेतले . योगा हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो याविषयी प्रथम त्यांनी उदबोधन केले . योग प्रात्यक्षिकानंतर त्यांनी प्राणायाम घेतले . या शिबिराचे उद्घाटन तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयातील गट शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती धसवाडीकर मॅडम, श्री राकेश महाजन साहेब विस्तार अधिकारी यांच्या हस्ते झाले, धसवाडीकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्व सांगून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले,तसेच व्यासपीठावर श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष टकले, श्री संत सावता गुरुकुल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब चव्हाण, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उरणकर मॅडम यांची उपस्थिती होती . या शिबिरासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . एकूण 450 जणांचा शिबिरात सहभाग होता. या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आज, दिनांक 15 जून, 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच नवागतांचे स्वागत शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोहळा संपन्न याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती कल्पना उरणकर या होत्या तर प्रमुख उपस्थिती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब चव्हाण सर हे होते, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले तसेच आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बालवर्ग ते 10 वी – या वर्गांच्या प्रवेशाच्या चौकशीची नोंदणी 1 एप्रिल ते 31 मे 2022 या काळात करता येईल नोंदणी केलेल्या पालकांना उपलब्ध जागेनूसार सर्व सूचना भविष्यात एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येतील.
औरंगाबाद ग्रामिण पोलिस उपायुक्त श्री विशाल नेहूल सर यांची शाळेला भेट.
शै. सहलीमध्ये विद्यार्थी उंट सफर करतांना व आनंद घेतांना.
शाळेत शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुर्यनमस्कार शिकवतांना शिक्षक.
संस्थेचे अध्यक्ष, मा.श्री हरीभाऊ बागडे नाना विद्यार्थी गुणवत्ते विषयी समाधान व्यक्त करतांना.
विद्यार्थी कॅरम खेळ खेळतांना.
विद्यार्थ्यांचे विविध छंद जोपसण्यासाठी विद्यार्थ्यांना बुध्दिबळ शिकवताना शिक्षिका.
श्री संत सावता गुरुकुल विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.
-->