आज दि.22 जुलै 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
आज दि.22 जुलै 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
आज, दिनांक 17 जुलै , 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात विठ्ठल नामाची शाळा भरून बाल गोपालांची अवघी दुमदुमली पंढरी. आज आषाढी एकादशीनिमित्त माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना उरणकर मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अप्पासाहेब चव्हाण सर आणि गुरुकुलातील सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शहरामधून पालखी आणि दिंडी काढून साजरी केली तसेच बालगोपालांनी विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा करून दिंडीमध्ये भजन अभंग गवळणी फुगड्या आदींचे प्रदर्शन करून पालकांचे तसेच ग्रामस्थांचे कौतुक मिळवले तसेच शहरवासी यांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन आणि बालगोपाला मधील विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले त्यानंतर शाळेच्या प्रणांगणामध्ये दिंडीचे रिंगण करून वारकरी वेशभूषा आलेल्या विद्यार्थ्यांनी फुगडी तसेच पावली खेळून आषाढी एकादशीचा आनंद साजरा केला तसेच विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामांच्या गीतांवर नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधले तसेच सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीनिमित्त केळी वाटप करण्यात आली मुख्याध्यापकांनी आषाढी चे महत्व सांगून कार्यक्रमाची सांगता केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी भक्ती मते आणि वैष्णवी पवार यांनी केले,या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
दैनंदिन अभ्यासाचा विद्यार्थी मनावरील ताण कमी करण्यासाठी व दैनंदिन अभ्यासात चैतन्य येण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील सृजनशिलता विकसित करण्यासाठी शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. त्यातील एक उपक्रम
श्री संत सावता गुरुकुल विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.
-->