आज, दिनांक 16 जून, 2025 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच नवागतांचे स्वागत आणि शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती कल्पना उरणकर मॅडम या होत्या तर प्रमुख उपस्थिती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आप्पासाहेब चव्हाण सर हे होते, सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती तसेच भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली, विद्यार्थ्यांनी आपले सुट्टी मधील अनुभव सांगितले तर मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या,तसेच आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प व मिठाई आणि पुस्तकं देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री काकासाहेब काकडे सर यांनी केले, तसेच या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य :-
प्रसिद्धी विभाग
श्री संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.












